Tuesday, 29 September 2020

मानसिकता

कर्ता पुरुष असू शकतो
करती स्त्री का नाही
आज ह्या उन्नत जगात
अजून ही काही लोकांची
मानसिकता का बदलत नाही

मुली नी नाव केल
तर म्हणतात 
हा तुमचा मुलगाच जणु
पण मी मुलगी असून 
हे का बर मान्य करू 
मी मुलगी च आहे 
मी का बरं
मुला ची उपमा घेऊ

ही मानसिकता बदलायला हवी 
कुठेतरी थाम्बायला हवी 
मुलगी ही मुलगी च आहे 
तीच ही वेगळ अस्तित्व आहे 
हे आता तरी मान्य करायला  हवं
थोड़ा आपल्या ला बदलायला हवं
स्त्री चा सन्मान करायला शिकायला हवं