सहसा एकांतात मी स्वतः शीच बोलते
कारण माझ्या प्रश्नाचे उत्तर फक्त मी स्वतः च देऊ शकते
आयुष्याच्या वळणा वर जेव्हा आपले ही साथ सोडतात
तेव्हा मी च फक्त माझ्या सोबत असते
धडपडते पण स्वतः च स्वतः ला सावरते
सहसा एकांतात मी स्वतः शीच बोलते
एकाटे पणा च्या टप्या वर
मी च स्वतः च्या बरोबर असते
साथ देते स्वतः ला
आणि मी च स्वतः ला धीर देत असते
सहसा एकांतात मी स्वतः शीच बोलते
आपुल्या च माणसान कडून दुखावल्या गेल्या वर
मी च स्वतः ला समजावते
कधी मन मोकळे पणा नी रडून तर कधी दुर्लक्ष करून
स्वतः च स्वतः च्या मना ला रमवते
सहसा एकांतात मी स्वतः शीच बोलते