Friday 24 November 2017

शोकाकुल

म्हणे चार दिवसा च हे जीवन असतं
जे आलय ते जाणं भाग असतं
सोबत असतो प्रेमा चा माणुस जेव्हा
मना ला एक धीर असतो
पण जीवनाची रीत च ही निराळी
ठरलेला आहे अंत प्रत्येक आदि साठी
आज असलेला माणूस
अचानक च होतो विरळ
आणि मागे सोडून जातो
त्याच्या प्रेमा चि भुरळ
त्या व्यक्तीच्या मोहा पोटी
अश्रूंची धारा वाहतो
आणि आठवणी च्या सागरात
आपण मंद बुडून जातो
का कुणास ठाऊक पण
आपण मोह बंध होतो
आणि सोडून गेलेल्या व्यक्ति चा
शोकाकुल करतो
जीवनाची ह्या रिती शी
कुणी ही अज्ञात नाही
पण शोकाकुल केल्या शिवाय
कुणीच राहत नाही
शोकाकुल केल्या नी
खरंतर काहीच होत नाही
सोडून गेलेला परत
कधी च येत नाही
तरी ही आपण विरहा च्या नदीत
उडी मारू पाहतो
आणि स्वतः च्या आयुष्याचा
निव्वळ खेळ करू लागतो

मग कशाला हा शोक
आणि स्वतः च्या आयुष्याचा
स्वतः च करून घ्यावा लोप
त्या पेक्षा जर आपण
त्याच्या आठवणींना ठेवून सोबत
पुढे वाढलो आयुष्यात
तर बहुतेक
होईल आनंदित तो ही आपल्या सोबत
बघून आपल्याला आनंदात
कारण शोक करून
आयुष्याच्या एका च ठिकाणी थांबून राहणे
खूप सोपं असतं
पण त्याच्या आठवणी आणि प्रेमा ला
सोबत घेऊन पुढे वाढण्यात च
खरं साहस असतं

जीवन म्हणजे आपल्या धैर्या ची
परीक्षा असते
आणि धैर्य व साहस च्या सोबती नेच
ही परीक्षा जिंकायची असते
जीवना च्या प्रत्येक टप्प्यावर
एक ना एक डोंगर भेटतोच
आणि सरळ साध्या मार्गा ला
तो खंडित करू पाहतो
पण विचलित ना होता
त्याला पार कराय च असतं
मार्ग सरळ नसला तरी
चालावं हे लागतच
तेव्हाच तर मिळते
आपल्याला भरारी उंच शिखरांची
आणि जीवनात घेऊन येते
क्षण आनंददायी....

Saturday 8 April 2017

मैत्री

मैत्री.........................


कधी रूसवा रुसवी
तर कधी हसवा हसवी
कधी भांडयच उगाच
तर कधी घट्ट मीठी

सर्वात सुन्दर अस हे नातं
जगतल्या सर्व नात्यां पैकी,
रक्ता च्या नात्यां  पेक्षा ही वर
असं हे नातं म्हणजेच मैत्री

तुझ काय आणि माझा काय
म्हणणारे ते दोस्त आणि तेंचि ती  यारी
आपण कीती  ही मोठे झालो तरी
न विसरणारी अशी त्या दोस्तान ची दोस्ती

वया च्या प्रत्येक क्षणात साथ असणारा
सुख असो वा दुःख, नेहमी हसवत राहणारा
असा तू एकमेव च मित्रा

लहानपणी शाळेत शिक्षकां चा मार असो
किंवा घरी खाल्लेला ओरडा
पण सर्व काही एका क्षणात विसरायच
तुझा शी बोल्या नंतर च मित्रा

कॉलेज मधला तो टाईम पास
आणि टाईम पास करतांना
खाल्लेला तो ओरड़ा
किती ती मस्ती  आणि किती तो वेडेपणा

कधी एक मेका ना चिडवायच
तर कधी उ गच कडायची खोडी
अशी ती दोस्ती यारी
विसरून जगा ची दुनियादारी

परीक्षा जवळ येत्याच्
करायचा अभ्यास एकत्र
आणि अभ्यासा चा नावा ख़ाली
घालायचा गोंधळ च फ़क्त

उलटून गेले दिवस ते
आणि आपण लागलो कमवायला
कधी इथे तर कधी तिथे
कामा साठी
आपण लागलो फिरायला


हळू हळू जात गेले दिवस
आणि आपण मोठे होत गेलो
नविन नाती जुडली काही
आणि असच आपण पुढे वाढत गेलो

पण नदी च्या पाण्या सारखं ,
वाहत राहणारं पण स्वछ आणि पारदर्शी
तसच राहिल ते नातं म्हणजेच,

आपली  मैत्री।।